महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 8, 2021, 9:06 PM IST

ETV Bharat / state

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तालुकास्तरावर स्थानिक प्रशासनाने केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी त्यांनी तालुक्यातील घाटंजी, झरीजामणी आणि वणी येथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पाहणी.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पाहणी.

यवतमाळ - जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तालुकास्तरावर स्थानिक प्रशासनाने केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पाहणी केली. यावेळी त्यांनी तालुक्यातील घाटंजी, झरीजामणी आणि वणी येथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच ग्रामीण रुग्णालय व कोविड केअर सेंटरमधील उपलब्ध सुविधांबाबतही आढावा घेतला. दरम्यान येथील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, कोतवाल तसेच गावचे सरपंच यांच्यासह गावकऱ्यांनीही तपासणीबाबत जानजागृती करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई

खासगी रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांना तपासणीकरीता प्रवृत्त करा. आपापल्या कार्यक्षेत्रातील लोकांमध्ये जनजागृती करा. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी लवकर तपासणी तसेच लवकर उपचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुकास्तरावर तसेच गावपातळीवर समित्यांनी चाचण्या वाढवाव्यात. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. नागरी भागात आपल्या प्रभागात व ग्रामीण भागात आपल्या गावात 'जाणीव-जागृती आपली जबाबदारी' ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी. येथील ग्रामीण रुग्णालयात तत्काळ २० ऑक्सिजन बेडचे नियोजन करा. तसेच नविन कोविड केअर सेंटर आवश्यकतेनुसार सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यासोबतच त्यांनी येथे किती पात्र लोकांचे लसीकरण करण्यात आले, याची माहितीही त्यांनी घेतली

ABOUT THE AUTHOR

...view details