यवतमाळ - विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सात मतदारसंघांमध्ये एकूण 21 लक्ष 72 हजार 205 मतदार असून, 2499 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे.
जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची संख्या 5333 आहे. तर निवडणुकीच्या कामासाठी सर्व मतदान केंद्रांवर एकूण 12 हजार 995 अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सातही मतदार संघात 4618 बॅलेट युनीट, 3429 कंट्रोल युनीट तसेच 3694 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत.
हेही वाचा यवतमाळ जिल्ह्यातील आदर्श गावाची वाट बिकट
निवडणुकीदरम्यान नागरिकांच्या सुविधेसाठी डिजीटल प्लॅटफार्मचा उपयोग करण्यात येणार असून यासाठी सी-व्हिजील अॅप, एमसीसी पोर्टल, वोटर हेल्पलाईन अॅप, पीडब्ल्यूडी अॅप, आदींचा वापर करण्यात येणार आहे. निवडणुकी संदर्भात माहिती देण्यासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.
वणी मतदारसंघात - 323 मतदान केंद्र, राळेगाव - 350 मतदान केंद्र, यवतमाळ - 412 केंद्र, दिग्रस - 378 केंद्र, आर्णी - 366 केंद्र, पुसद - 328 केंद्र आणि उमरखेड मतदारसंघात 342 मतदान केंद्रांचा समावेश आहे.
हेही वाचा कर्जमाफी न मिळाल्याने यवतमाळमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
विधानसभा क्षेत्रनिहाय मतदारांची संख्या