यवतमाळ -कोविडमुळे राज्यातील लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्याच्या मागणीसाठी लोककला महासंघाच्या पदाधिकार्यांनी यवतमाळच्या तिरंगा चौकात धरणे आंदोलन केले. तसेच यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले.
'ग्रामीण भागातील सांस्कृतिक कार्यक्रमांवरील बंदी उठवा', लोककलांवतांवर उपासमारीची वेळ - कोरोना
कोविडमुळे राज्यातील लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्याच्या मागणीसाठी लोककला महासंघाच्या पदाधिकार्यांनी यवतमाळच्या तिरंगा चौकात धरणे आंदोलन केले. तसेच यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले.
लोककलेच्या माध्यमातून पथनाटककार, गायक, वादक, कीर्तनकार, असे विविध लोककलावंत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र कोरोनामुळे सध्या सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे, त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यात यावेत, गरजूंना आर्थिक मदत देण्यात यावी, मानधनासाठी आवश्यक असलेली वयाची अट शिथिल करावी, बेरोजगार लोककलावंतांना मासिक मानधन सुरू करण्यात यावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.