यवतमाळ -गत काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढीच्या संख्येत घट आली असून बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. ही निश्चितच जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 324 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे, तर गत 24 तासांत 37 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.
यवतमाळमध्ये कोरोना रुग्ण वाढीच्या संख्येत घट; बरे होण्याचे प्रमाणही वाढले
यवतमाळमध्ये कोरोना रुग्ण वाढीच्या संख्येत घट आली असून बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत 599 सक्रिय रूग्ण असून आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 9053 झाली आहे. शनिवारी 37 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरुवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8104 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 288 मृत्युची नोंद आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 80153 नमुने पाठविले असून यापैकी 79316 प्राप्त, तर 837 अप्राप्त आहेत. तसेच 70263 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने सांगितले.