यवतमाळ - राज्यात सध्या हिंसा वाढविण्यचा काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आपण संविधान दिवस साजरा करतो आणि दुसरीकडे राम माझा धर्म असे म्हणतो. धर्म तुम्हाला, मला दोन आकारमध्ये आणि रंगात पेटवणारा रंग पाहिजे की एकत्र ठेवणारा रंग पाहिजे असा प्रश्नही यावेळी उपस्थित्यांना केला.
Yashomati Thakur Allegations : 'सत्ता हातात घेण्यासाठी महाराष्ट्र पेटवण्याचं षडयंत्र' - MLA Anantrao Deosarkar
आपला धर्म तिरंगा असायला हवा. अमरावतीमध्ये काही लोक आतंक करत होते. सत्ता हातात घेण्यासाठी महाराष्ट्र पेटवण्याच षडयंत्र होते, अशी घणाघाती टीका राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. त्या माजी आमदार अनंतराव देवसरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
आपला धर्म तिरंगा असायला हवा. अमरावतीमध्ये काही लोक आतंक करत होते. सत्ता हातात घेण्यासाठी महाराष्ट्र पेटवण्याचं षडयंत्र होते, अशी घणाघाती टीका राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. त्या माजी आमदार अनंतराव देवसरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. राज्यात विरोधकांडून सत्ता मिळविण्यासाठी जातीय दंगली घडवल्या जात आहे. दोन्ही कट्टर पंथी हे चांगले मित्र असतात. आपल्याला वेड्यात काढतात. देशात तेढ वाढवण्याचे काम सुरू आहे, अशी टीका राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.
उमरखेड येथे अनंतराव देवसरकर यांच्या स्मृतिदिना निमित्य वडिलांच्या वर्षश्राधला जेवणावळीचा खर्च टाळून हजार दिव्यांगाना साहित्य वाटप करण्याचा उपक्रम यवतमाळचे जिल्हा परिषद बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी राबविला. यावेळी राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले. राम देवसरकर याच्या रामसेतू उपक्रम अंतर्गत उमरखेड तालुक्यातील हजार दिव्यांग लोकांची नोंदणी करून तपासणी करून त्याना मोफत सायकल, बाईक वाटप करण्यात आले. त्याच्या उपक्रमाचे कौतुक केल्या जात आहे.