यवतमाळ - सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दीड लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना जिल्ह्यातील आर्णी शहरात घडली आहे. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. नरसिंग धरमसिंग जाधव (वय 59) असे बॅग चोरीला गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दीड लाख रुपयांची बॅग लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद हे ही वाचा -परभणीत जिल्ह्याच्या गुन्हे विषयक बातम्या फक्त एका 'क्लिक'वर
जाधव यांनी घराच्या बांधकामासाठी बँकेतून एक लाख 40 हजार रुपये काढले होते. मुख्य रस्त्यावरील एका दुकानासमोर अज्ञात चोरट्याने त्यांना पैसे पडल्याचा बनाव केला. जाधव यांनी मागे फिरून पाहिले असता चोरट्याने दुचाकीला लटकविलेली त्यांची बॅग घेऊन पोबारा केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या आरोपीचा शोध आर्णी पोलीस घेत आहेत.
हे ही वाचा -मोलकरणीचा वृद्ध महिलेवर हल्ला; दागिने घेऊन पसार