यवतमाळ - फर्निचरचा व्यवसाय करणाऱया व्यक्तीस फिरत्या पथकाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱयाने (आरएफओ) साडेचार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. २५ एप्रिलला रात्रीच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांला रक्कम स्वीकारताना सापळा रचून रंगेहात ताब्यात घेतले. वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गुजर असे या आरोपीचे नाव आहे.
यवतमाळमध्ये साडेचार हजाराची लाच घेताना वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
फर्निचरचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने शिरोली येथील सागवान झाडांच्या खरेदीचा सौदा केला होता. या झाडांचे पासिंग करून प्रमाणपत्र देण्याकरता फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गुजर यांनी २०० रुपये घनमीटर प्रमाणे २३.५ घनमीटर सागवान झाडांची ४ हजार ६०० रुपये लाचेची मागणी केली होती.
फर्निचरचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने शिरोली येथील सागवान झाडांच्या खरेदीचा सौदा केला होता. या झाडांचे पासिंग करून प्रमाणपत्र देण्याकरता फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गुजर यांनी २०० रुपये घनमीटर प्रमाणे २३.५ घनमीटर सागवान झाडांची ४ हजार ६०० रुपये लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून केली त्यानंतर २५ एप्रिलला पांढरकवडा येथील बसस्थानक परिसरात सापळा रचून परिक्षेत्र अधिकारी महेश गुजर याला रक्कम स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्यूरो गजेंद्र क्षीरसागर, सुरेंद्र जगदाळे, भारत चिरडे, अनिल राजकुमार, किरण खेडकर, विजय अजमिरे, महेश वाकोडे, राहुल गेडाम यांनी केली.