यवतमाळ - कल्पकता आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असली की माणसाला स्वस्थ बसू देत नाही. यातूनच नवीन वस्तूचा उदय होतो. कोरोना काळात घरी असल्याने एका युवकाने घरी असलेल्या भंगारातील आपल्या सायकलला इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. केवळ 17 हजार रुपये खर्च करून एका युनिटमध्ये म्हणजेच पाच रुपयात पन्नास किलोमीटर ही इलेक्ट्रिक सायकल चालते. हिमांशू घावडे असे त्या तरुणाचे नाव असून, तो नेर तालुक्यातील ब्राह्मणवाडा (पूर्व) या गावातील रहिवासी आहे.
तरुणाने बनवली पाच रुपयात पन्नास किलोमीटर चालणारी इलेक्ट्रिक सायकल हेही वाचा -आमदार नियुक्ती प्रलंबित ठेवण्यामागे राज्यपालांवर राजकीय दबाव असेल -संजय राऊत
- लहानपणापासूनच जुगाडू व्यक्तिमत्व
हिमंशू हा पॉलिटेक्निक इलेक्ट्रॉनिक शाखेचा विद्यार्थी आहे. लहानपणापासूनच जुगाडू काहीतरी करण्याची त्याला आवड होती. काही दिवसांपूर्वी त्याने घरात भंगारात ठेवून असलेली सायकल बाहेर काढली. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडत असल्याने दुचाकी चालवणे अनेकांना परवडत नाही. त्यामुळे कमी खर्चात प्रवास करता येईल अशी ई-सायकल बनवण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला. त्याच्याजवळ जमा असलेल्या पैशांमधून त्याने काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली.
- युट्यूबरून घेतली माहिती -
नेरमधील तरुणाने बनवली इलेक्ट्रिक सायकल
युट्यूब पाहत असताना हिमांशूला ई-बाइक दिसली. त्यावरून त्याने असेच इलेक्ट्रॉनिक साहित्य लावल्यास ई-सायकल तयार होऊ शकते असा विचार त्याच्या डोक्यात आला. यासाठी त्याने इंदोरवरून बॅटरी व नागपूरवरून इलेक्ट्रिक साहित्य विकत आणले. गावातीलच वेल्डिंगच्या दुकानातून त्याने सायकलवर ही सिस्टीम बसवली. केवळ एका युनिटमध्ये साडे चार तासात ही बॅटरी चार्ज होते आणि पन्नास किलोमीटरपर्यंत धावते. या ई-सायकलला 45 पर्यंतची हाय स्पीड मिळते.
- शेतकऱ्यांसाठी होणार उपयुक्त -
शेतकऱ्यांना आज पिकांना भाव मिळत नाही, तर दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी दोन दिवसांतून किमान 100 रुपयाचे पेट्रोल लागते. त्यामुळे गावापासून तीन-चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात जाण्यासाठी ही सायकल शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. भविष्यात अशा ई-सायकल तयार करून त्याचे पेटंट घेण्याचीही इच्छा हिमांशू घावडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
तरुणाने बनवली इलेक्ट्रिक सायकल हेही वाचा -हितचिंतकांनीच मी भ्रष्टाचारी असल्याची प्रतिमा जनमाणसात उभी केली; एकनाथ खडसेंचा वाढदिवशी विरोधकांवर निशाणा