यवतमाळ - जिल्ह्यातील महागाव, उमेरखेड, आर्णी, दिग्रस, दारव्हा, घाटंजी तालुक्यातील २४ गावात शुक्रवारी रात्री ९ वाजून २२ मिनिट ५५ सेकंदांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाच्या तीव्रतेमुळे काही घरांना तडे गेले. त्यामुळे परिसरातील भयभीत झालेल्या नागरिकांनी रात्र जागून काढली.
यवतमाळमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांनी संपूर्ण रात्र काढली जागून - loss
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, उमरेखेड, आर्णि, दिग्रस, दारव्हासह परिसरात रात्रीच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले. यामुळे नागरिक भयभीत झाले असून, नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली.
शुक्रवारी रात्रीपासून प्रशासनातील तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, उविभागीय अधिकारी यांनी गावात जाऊन घटनास्थळी भेट दिली. तसेच झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे. हे भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.
महागाव तालुक्यातील, कुरली, गरगाव, हिवरा, फुलसावंगी, वरोडी, पोहंडुळ, धनोडा, पेढी, काळी, बोरी इजारा, साई, करंजखेड, कासारबेहळ, काळी टेंभी चिल्ली अन्य गावात भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. अनेकांच्या घरातील भांडी पडल्यामुळे सर्व नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. तर अनेक गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे स्थानिकांनी सांगितले. काही गावांतील घरावरील पत्रे हलल्याने नागरिक भयभीत झाले. भूकंपानंतर नागरिक घराबाहेर पडले होते. भूकंपाच्या या सौम्य झटक्यामुळे नागरिकांनी रात्र जागून काढली.