यवतमाळ -दिग्रस येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत अजबराव सखाराम उघडे या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेची वाटणी पत्रानुसार नोंद चढविण्यात यावी असा अर्ज एका व्यक्तीने केला होता. या कामाकरता अजबराव उघडे याने अडीच हजार रुपयांची मागणी केली होती.
भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात
पंधराशे रुपयात काम करून देण्याचे त्याने कबूल केले होते. याबाबत अर्जदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली होती. या विभागाने सर्व प्रक्रिया करून सापळा रचला आणि भुमी अभिलेख कार्यालय कर्मचारी अजबराव उघडे याला पंधराशे रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात
पंधराशे रुपयात काम करून देण्याचे त्याने कबूल केले होते. याबाबत अर्जदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली होती. या विभागाने सर्व प्रक्रिया करून सापळा रचला आणि भुमी अभिलेख कार्यालय कर्मचारी अजबराव उघडे याला पंधराशे रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहा महिन्यात अशाच दोन यशस्वी कारवाया केल्या आहेत. यावरून येथील प्रशासकीय कार्यालयात भ्रष्टाचार किती रुजला आहे याची प्रचिती येते.