महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन - various

केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ देण्याचे जाहीर केले. मात्र, अद्यापही अंगणवाडी सेविकांच्या वेतनात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५०० अंगणवाडी सेविकांनी यवतमाळ येथील बसस्थानक चौकात जेलभरो आंदोलन केले.

अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन

By

Published : Feb 17, 2019, 7:41 PM IST

यवतमाळ - केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांना वेतन वाढ देण्याचे जाहीर केले. मात्र, अद्यापही अंगणवाडी सेविकांच्या वेतनात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५०० अंगणवाडी सेविकांनी यवतमाळ येथील बसस्थानक चौकात जेलभरो आंदोलन केले.

अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन

केंद्र शासनाने सप्टेंबर २०१८ मध्ये अंगणवाडी सेविका यांच्या १५०० रुपये, मिनी अंगणवाडी सेविका यांना १२५० रुपये, मदतनीस यांना ७५० रुपये मानधन वाढ केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने परिपत्रक काढून जाहीर केले होते. मात्र, जानेवारी २०१९ पर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याबाबत कुठलीही पावले उचलली गेली नाही. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडून हे जेल भरो आंदोलन करण्यात आले.

अंगणवाडी सेविका मदतनीसला शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा देण्यात यावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कमीत कमी ६ हजार रुपये पेन्शन सहित सर्व सामाजिक सुरक्षा लागू करावी, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे अंतर्गत चालणाऱ्या कामकाजाचे खासगीकरण करण्यात येऊ नये, सध्या मिळणाऱ्या सेवा समाप्ती लाभात भरीव वाढ करण्यात यावी, समायोजन याच्या नावाखाली अंगणवाड्यांची संख्या कमी करण्याचे पाऊल मागे घेण्यात यावे, अशा विविध मागण्या जेल भरो आंदोलनातून करण्यात आल्या.


जेलभरो आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्ष उषा डंभारे, आयटक जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे, सविता कट्यारमल, जिल्हा सचिव मनिशी इसाळकर, जिल्हा संघटक गुलाब उंब्रतकर, विजय जाधव, लीला सोळंके यांनी केले. या आंदोलनात जिल्हाभरातील ५०० अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details