यवतमाळअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार Agriculture Minister Abdul Sattar 3 दिवशीय विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथे सायंकाळी 7 वाजता टॉर्च उजेडात शेती पाहणी केली आहे. अवघ्या काही मिनिटातच कृषिमंत्री गेल्याने शेती पाहणीचा फार्स असल्याचे ओरड शेतकरी वर्गातून होत आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार याचा दौरायवतमाळ जिल्ह्यातील काही भागांना अचानक भेटी दिल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, महागाव, सुकळी येथे भेट देऊन शेतात जाऊन कपाशी, तुर आणि सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर उमरखेडच्या मार्लेगाव येथे दुपारी ३ वाजता त्यांचा नियोजित दौरा होता. Agriculture Minister Abdul Sattar मात्र ते रात्री ७ वाजता पोहोचले. यावेळी काळोख पसरला असताना त्यांनी रात्रीच्या अंधारात मोबाईल टॉर्चचा उजेड करून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतीपाहणीचा फार्स काही मिनिटात आटोपता घेतला आहे.