आंतरवासिता डॉक्टरांचा पालकमंत्र्यांना घेराव; इतर जिल्ह्यांप्रमाणे कोरोना मानधन देण्याची मागणी - यवतमाळ कोरोना मानधन देण्याची मागणी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासिता डॉक्टर कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रादूर्भाव होत असतानाही आंतरवासिता डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णालयातील रुग्णांना आपली सेवा दिली. येथील आंतरवासिता डॉक्टरांना केवळ 10 हजार 800 रुपये असे तोकडे मानधन मिळत आहे.
यवतमाळ
यवतमाळ- वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 143 आंतरवासिता डॉक्टर म्हणून काम करीत असलेल्या डॉक्टरांनी इतर जिल्ह्याप्रमाणे कोरोनाचा भत्ता मिळावा, या मागणीसाठी आज पालकमंत्री संजय राठोड यांना जिल्हा रुग्णालयात घेराव घातला. यावेळी आंतरवासिता डॉक्टरांनी पालकमंत्र्यांच्या समोर आपली बाजू मांडली असता 26 जानेवारीनंतर पाहू, असे टोलवाटोलवीचे उत्तर पालकमंत्र्याकडून मिळाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासिता डॉक्टर कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रादूर्भाव होत असतानाही आंतरवासिता डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णालयातील रुग्णांना आपली सेवा दिली. येथील आंतरवासिता डॉक्टरांना केवळ 10 हजार 800 रुपये असे तोकडे मानधन मिळत आहे. महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयात मात्र, त्यांना 39 हजार रुपयांपर्यंतची कोरोना भत्ता दिला जात आहे. त्याच धर्तीवर यवतमाळच्या आंतरवासिता डॉक्टर्सना कोरोना भत्ता मिळावा. या मागणीसाठी एप्रिल 2020 पासून प्रशासनासोबत कधी उपोषण, कामबंद आंदोलन, काळ्या फिती लावून निषेध करीत आंदोलन करीत आहे.
फक्त टोलटोलवीचे काम सुरू
असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न महाराष्ट्र (अस्मि) संघटनेने वेळोवेळी राज्य शासनासोबत बोलणी केली. यावेळी आपल्या जिल्हा समितीकडे मागणी करावी असे स्पष्ट निर्देश दिले. त्यामुळे पालकमंत्री यांना दोन वेळा भेटून प्रश्न मांडला. त्यांनी जिल्हाधिकारी यांना भेटण्यास सांगितले. यानंतर जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे आमची मागण्या मांडल्या. मात्र. कुठल्याच ठोस निर्णय घेण्यात आला नाही. केवळ टाळाटाळीचे काम सुरू असल्याचे आरोप आंतरवासिता डॉक्टरांनी केला आहे.