महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवैध वाळू उत्खनन प्रकरणी बेलोरा रेती घाटावर कारवाई; पोकलँड मशीनसह ट्रक जप्त

अचानक रेती घाटाची तपासणी केली असता तेथे अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी दोन पोकलँड मशीनने (मॉडेल क्रमांक SY 210 C-9 व SY 220 C-9) रेती उत्खनन करण्यात येऊन चार ट्रकमध्ये भरण्यात येत होती.

अवैध वाळू उत्खनन प्रकरणी बेलोरा रेती घाटावर कारवाई

By

Published : May 7, 2019, 9:20 PM IST

यवतमाळ- वणी उपविभागांतर्गत येणाऱ्या बेलोरा रेती घाटावर रात्रीच्या दरम्यान अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दोन पोकलँड मशीन व चार ट्रक जप्त करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार श्याम धनमने, बेलोराचे तलाठी व पोलीस कर्मचारी यांच्या ताफ्यासह रात्री ११.३० वाजता अचानक रेती घाटाची तपासणी केली असता तेथे अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी दोन पोकलँड मशीनने (मॉडेल क्रमांक SY 210 C-9 व SY 220 C-9) रेती उत्खनन करण्यात येऊन चार ट्रकमध्ये भरण्यात येत होती. सदर दोन्ही पोकलँड मशीन व चार ट्रक प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहेत.

यावेळी ट्रक क्रमांक एमएच 31- सीबी 9086 (चालक शेख कयम), एमएच 04 - बीजी 810 (चालक रमेश पाटील), एमएच 31 - एपी 7333 (चालक गजानन अंड्रसकर) आणि ट्रक (क्रमांक एमएच 40 - बीजी 3883) हे ट्रक रेती घाटावर दोन पोकलँड मशीनद्वारे अवैध वाळू उत्खनन करून ट्रकमध्ये भरताना पकडण्यात आले. एक पोकलँड मशीनचा चालक पळून गेला असून दुसरा चालक धनंजय यादव व ट्रकचालक यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, भारतीय दंड संहिता व पर्यावरण कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मशीन व वाहने शिरपूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details