यवतमाळ- मागील काही दिवसांपासून यवतमाळ शहरात दुचाकी चोरट्यांनी पोलिसांची झोप उडवली होती. शहर ठाण्याचे शोध पथक आझाद मैदान परिसरात असताना तेथे गोपाल शालिक आडे (२५ रा. तळेगाव ता. दारव्हा) हा संशयास्पद स्थितीत आढळला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. यावेळी लपवून ठेवलेल्या 8 दुचाकी पकडल्या असून 5 आरोपींना अटक केली आहे.
यवतमाळमध्ये चोरीच्या साडेतीन लाखांच्या 8 दुचाकी जप्त; 5 आरोपी अटकेत - यवतमाळमध्ये चोरीच्या साडेतीन लाखांच्या 8 दुचाकी जप्त
दयाराम राठोड (३०), संदीप राठोड (३३), योगेश जाधव (२१), राहूल कुरसंगे (२५) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच धामणगाव-नागपूर बायपासजवळ पुलाखाली लपवून ठेवलेल्या 3 लाख 60 हजार किमतीच्या चोरीच्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
यवतमाळमध्ये चोरीच्या साडेतीन लाखांच्या 8 दुचाकी जप्त
दयाराम राठोड (३०), संदीप राठोड (३३), योगेश जाधव (२१), राहूल कुरसंगे (२५) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच धामणगाव-नागपूर बायपासजवळ पुलाखाली लपवून ठेवलेल्या 3 लाख 60 हजार किमतीच्या चोरीच्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधिकारी धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनात, सहायक निरीक्षक रामकृष्ण भाकडे, गजानन क्षीरसागर, रवी आडे, अमित कदम, मिलिंद दरेकर, अल्ताफ शेख, अंकुश फेंडर, राजकुमार कांबळे यांनी केली.