यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या आठ जणांचे अहवाल 'पॉझिटिव्ह' आले आहेत. यापैकी 7 जण दुसऱ्या राज्यातील असून, एक जण यवतमाळ जिल्ह्यातील आहे. 7 पैकी 4 उत्तर प्रदेशचे, 2 पश्चिम बंगालचे तर 1 दिल्लीचा आहे. हे सातही जण तबलिगी समाजाशी निगडीत आहेत. तर पॉझिटिव्ह असलेला आठवा व्यक्ती या 7 जणांच्या संपर्कात आला होता.
यवतमाळमध्ये विलगीकरण कक्षातील 8 जणांचे अहवाल 'पॉझिटिव्ह' - yavatmal corona update
यवतमाळमध्ये विलगीकरण कक्षात सद्यस्थितीत एकूण 65 जण भरती आहेत. यापैकी 51 जणांचे अहवाल महाविद्यालयाला प्राप्त झाले. 14 जणांचे अहवाल यायचे बाकी आहेत. प्राप्त झालेल्या अहवांलापैकी 43 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
विलगीकरण कक्षात सद्यस्थितीत एकूण 65 जण भरती आहेत. यापैकी 51 जणांचे अहवाल महाविद्यालयाला प्राप्त झाले. 14 जणांचे अहवाल यायचे बाकी आहेत. प्राप्त झालेल्या अहवालांपैकी 43 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकाच्या घराशेजारील भाग कंटेनमेंट (प्रतिबंधित) करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या घरातील इतर कुटुंबीय, ते ज्यांच्या संपर्कात आले असतील असे नातेवाईक व इतर संपर्कातील नागरिकांचा शोध सुरू आहे. त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सांगितले.
गुलमोहर कॉलनी आणि भोसा रोड, मेमन कॉलनी, इंदिरा नगर परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एम. डी. सिंग, पोलीस अधीक्षक एम. राज. कुमार यांनी या भागातील परिसराची पाहणी केली. याच भागातील 8 कोरोना रुग्ण असून हा भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे. या भागातून 31 मार्च व 1 एप्रिल रोजी पॉझिटीव्ह निघालेल्या नागरिकांना आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले होते. हा सर्वं परिसर निर्जंतुकिकरण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.