यवतमाळ- येथील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर अवैद्यरित्या कत्तलीसाठी नेत असलेल्या 57 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. यावेळी चार संशयितांना वडकी पोलिसांनी अटक केली. रात्री एक वाजताच्या सुमारास सापळा रचून हा कंटेनर पकडण्यात पोलिसांना यश आले.
कत्तलीसाठी जाणाऱ्या 57 जनावरांची सुटका; वडकी पोलिसांची कारवाई
नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर अवैद्यरित्या कत्तलीसाठी नेत असलेल्या 57 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. यावेळी चार संशयितांना वडकी पोलिसांनी अटक केली.
या कारवाईत मोहम्मद राशिद मजीद खा (40, रा.सहरमपूर जि.राजगड, मध्यप्रदेश) गुल्फाम बाबर पठाण (24, रा. बहादुरनगर ता. नुक्कड, उत्तरप्रदेश), सहीम खा असगर (19, रा. कळमेरी, जि. बीदिशा, मध्यप्रदेश), इमरण खान रहिमखान (22, रा. निबुखेडा, ता.इचावड, जि. सिसोर, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आली आहे. या चौघांवर प्राण्यांची निर्दयपणे वागणुकी पासून प्रतिबंध अधिनियम व प्राणी रक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वडकी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रशांत गीते, अरुण भोयर, मिलिंद गोफने, विलास धडसे घनश्याम मेसरे, प्रदीप भानारकर, किसन संकुरवार, हरीश धुर्वे, उद्धव घुगे, गौरव नागलकर यांनी केली.