यवतमाळ - दिग्रस तालुक्यातील दत्तापुर येथे वीज पडून पाच बालके गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही सर्व बालके शेतामध्ये बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने त्यांनी झाडाखाली आडोसा घेतला . मात्र वीज त्या झाडावरच कोसळल्याने ही बालके गंभीर जखमी झाली. या जखमी बालकांना उपचारासाठी डिग्रस येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. राम भट, आहु शेळके, संतोष शेळके, वांशिका साळवे, मंगेश टाले असे जखमी झालेल्या बालकांची नावे आहेत.
यवतमाळ; वीज कोसळून पाच बालके गंभीर जखमी - मुसळधार पाऊस यवतमाळ
ही पाचही बालके शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. मात्र अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतातील बाभळीच्या झाडाखाली त्यानी आसरा घेतला. अन नेमकी त्याच झाडावर वीज कोसळली.
झाडावर कोसळली वीज
ही पाचही बालके शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. मात्र अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतातील बाभळीच्या झाडाखाली त्यानी आसरा घेतला. अन नेमकी त्याच झाडावर वीज कोसळली. यात जखमी झालेली सर्व बालके 10 ते 12 खालील आहे. जखमी बालकांना दिग्रस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहेे. यात रब्बी पिकांचे व गावातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेही वाचा-छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी उडवली बस; डीआरजीचे तीन जवान हुतात्मा