यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेले व सुरुवातीला पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आलेले 38 लोक, 14 दिवसांच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या 38 पैकी 3 जणांना संस्थात्मक विलागीकरण कक्षात ठेवण्यात येणार असून उर्वरित 35 जण गृह विलगीकरणात राहणार आहेत.
यवतमाळमध्ये अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 45 वरून 7 वर; 38 रुग्णांना डिस्चार्ज - यवतमाळ कोरोना अपडेट
जिल्ह्यात आता अॅक्टिव्ह पॉझिटिव्हची संख्या 45 वरून 7 वर आली आहे. विशेष म्हणजे 24, 25 आणि 26 एप्रिल यादरम्यान सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडली. त्यानंतर रुग्ण वाढीचा वेग कमी झाला असला तरी एक-दोन, पॉझिटिव्ह रुग्ण येणे सुरू होते. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा 98 वर गेला होता.
जिल्ह्यात आता अॅक्टिव्ह पॉझिटिव्हची संख्या 45 वरून 7 वर आली आहे. विशेष म्हणजे 24, 25 आणि 26 एप्रिल यादरम्यान सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडली. त्यानंतर रुग्ण वाढीचा वेग कमी झाला असला तरी एक-दोन, पॉझिटिव्ह रुग्ण येणे सुरू होते. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा 98 वर गेला होता. यापैकी तब्बल 91 जणांना बरे करण्यात आरोग्य विभागाला लक्षणीय यश आले आहे. यवतमाळ जिल्ह्यासाठी ही अतिशय दिलासादायक बातमी असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
सुरुवातीला केवळ यवतमाळ शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मात्र, नंतर नेर आणि उमरखेड़ (मौजा धानोरा) येथे पॉझिटिव्ह रुग्ण आल्याने चिंतेत भर पडली. उमरखेड़ येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व हाय रिस्क व लो रिस्क अशा 68 लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविले. हे सर्व रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. तसेच नेर येथील हाय रिस्क व लो रिस्क अशा 76 जणांचे रिपोर्ट्स तपासणीसाठी पाठवले असता यापैकी 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 73 रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. उमरखेड़, महागाव, नेर आणि सर्व यवतमाळ जिल्ह्यासाठी ही अतिशय समाधानाची बाब आहे.