यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 45 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात मागील 24 तासात 36 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.
यवतमाळमध्ये 45 जणांची कोरोनावर मात; 36 नव्याने पॉझिटिव्ह - yavatmal corona positive cases
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात एकूण 425 अहवाल मिळाले आहेत. यापैकी 36 नव्याने पॉझिटिव्ह तर 389 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात एकूण 425 अहवाल मिळाले आहेत. यापैकी 36 नव्याने पॉझिटिव्ह तर 389 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 475 ॲक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9 हजार 374 झाली आहे. शनिवारी 45 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8 हजार 444 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 297 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत 84 हजार 534 नमुने पाठविले असून यापैकी 83 हजार 859 अहवाल प्राप्त झाले असून 675 अहवाल अद्यापही मिळाले नाहीत.