यवतमाळ - जिल्ह्यात मागील बारा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यात साडेतीन हजार पॉझिटिव्ह रुग्ण निघाले, तर 36 कोरोणा बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत पॉझिटिव रुग्णांचा सरासरी दर 13. 85 टक्के इतका आहे. त्यामुळे जिल्ह्यात रोज 5000 आरटीपीसीआर तसेच अँटीजन तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव रुग्णांचा दर यवतमाळचा असून तो 31.70 असल्यामुळे रोज किमान हजार तपासण्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात बारा दिवसात 36 कोरोना बळी तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण दर- जिल्ह्यातील दिग्रस 20. 38, पुसद 16. 69, दारव्हा 10.15, नेर 10:28, बाभूळगाव 9.72, उमरखेड 9.99, पांढरकवडा 5.55, घाटंजी 9.13, वणी 7.81, आर्णी 12.4, महागाव 7.34, राळेगाव 4.87, कळंब 3.52, मारेगाव 3.94, झरीजामनी 2.13 टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठाना मधील कर्मचारी, शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, कोरोना स्प्रेडर, दूध, भाजीपाला, वृत्तपत्र विक्रेते, पोस्टमन, घरोघरी जाऊन साहित्य विक्री करणारे व इतर घरपोच साहित्य विक्री करणारे, आठवडी बाजार, घाऊक भाजी मंडई येथील विक्रेते, फळविक्रेते, औद्योगिक कारखान्यांमधील काम करणारे कर्मचारी तसेच गर्दी होण्याची संभावना ज्या ठिकाणी जास्त असते अशा ठिकाणी तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
सर्व तालुक्यात किमान एक पॉझिटिव्ह पेशंटमागे किमान 20 नागरिकांच्या तपासण्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
हेही वाचा-मनसुख हिरेन हत्या प्रकरण: सचिन वझे यांना एनआयए'ने केली अटक