यवतमाळ - उपचाराअभावी 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना वणी शहरात घडली. शिवन्या कांबळे (वय 3) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. चिमुकलीला सर्पदंश झाल्यामुळे वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, तेथे उपचार न झाल्यामुळे चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाला.
यवतमाळमध्ये उपचाराअभावी ३ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
उपचाराअभावी 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना वणी शहरात घडली. शिवन्या कांबळे (3) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. चिमुकलीला सर्पदंश झाल्यामुळे वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
शिवन्या ही आपल्या घरी आईबरोबर रात्री झोपली असताना तिला सापाने दंश केला. त्यानंतर तिला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिच्यावर उपचार न करता तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देऊन डॉक्टरांनी आपली बेजबाबदार वृत्तीचे प्रदर्शन केले. यावेळी मुख्य डॉक्टर हे अनुपस्थित होते. त्यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला चंद्रपूरला पाठवण्यात आले होते मात्र, तिचा वाटेतच मृत्यू झाला. वणी येथील ग्रामीण रुग्णालयात जर शिवन्याला वेळीच उपचार मिळाले असते तर तिचे प्राण वाचला असता, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.