यवतमाळ- विदेशी दारूच्या 12 पेट्या अवैधरीत्या कारमधून घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हुंडाई कारमधून अवैध दारु घेऊन जात होते. याची माहिती मिळतात पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडले. त्यांच्याकडून विदेशी दारुच्या 12 पेट्या, हुंडाई असेन्ट कंपनीची कार आणि 3 मोबाईल जप्त करण्यात आले. वर्धा आणि चंद्रपूर या लगतच्या दोन जिल्ह्यात दारू बंदी असल्याने या दोन्ही जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यातील बोर्डरवरुन मोठ्या प्रमाणावर दारु तस्करी होते.
आलिशान कारमधून 12 बॉक्स विदेशी दारू जप्त, दोघांना अटक - arrest
वर्धा आणि चंद्रपूर या लगतच्या दोन जिल्ह्यात दारू बंदी असल्याने या दोन्ही जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यातील बोर्डरवरुन मोठ्याप्रमाणावर दारु तस्करी होते.
अवैध दारू जप्त
पोलीस निरीक्षक शाम सोनटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निखिल खडतकर, संजय कासार, प्रकाश मुंडे, संतोष मारबते, सलीम पापूवाले, राहुल मोकळे, नितीन गेडाम, दिलीप पोटभरे, राजू साळवे यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास राळेगाव पोलीस ठाणे करीत आहे.