यवतमाळ- जिल्ह्यात गुटखा माफियांनी आपले पाय रोवल्यानंतर सर्वत्र सर्रास गुटखा विक्री होऊ लागली आहे. शहर पोलिसांनी छापेमारी करून १ लाख रुपयांचा अवैध गुटखा साठा जप्त केला. पांढरकवडा मार्गावरील सय्यद नियाज अहमद सय्यद फिरोज यांच्याकडे विविध कंपनीचा गुटखा साठविला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून हा छापा मारण्यात आला.
यवतमाळामध्ये एक लाख रुपयांचा अवैध गुटखा साठा जप्त
पांढरकवडा मार्गावरील सय्यद नियाज अहमद सय्यद फिरोज यांच्याकडे विविध कंपनीचा गुटखा साठविला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून हा छापा मारण्यात आला. नजर, विमल, फ्रेंड आदी कंपनीचा गुटखा मिळून आला.
सदर ठिकाणाहून नजर, विमल, फ्रेंड आदी कंपनीचा गुटखा मिळून आला. जिल्ह्यात गुटखाबंदी कायद्याची पायमल्ली केली जात असल्याने सहज गुटखा उपलब्ध होत आहे. याला अन्न व औषधे प्रशासन विभाग आणि पोलिसांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याने शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो तरुण या गुटख्याच्या विळख्यात अडकले आहेत. गुटख्याची खेप पाठविणारे, खेप आणणारे आणि साठ्याची विल्हेवाट लावणारे, अशी एक मोठी साखळी जिल्ह्यात असून पोलीस आणि संबंधित यंत्रणा यांच्या साटेलोट्यातून गुटख्याची विक्री केल्या जात असल्याची नागरिकांची ओरड आहे. पोलीस मात्र किरकोळ कारवाया करीत असून गुटखा माफियांचा बंदोबस्त लावण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.