वाशिम: नागपूर-मुबंई दृतगती महामार्गावरील केनवड येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडल्याची दुर्घटना घडली. अनिल प्रकाश पवार या 22 वर्षीय तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले, त्यांनी महामार्ग रोखून ठेवल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती.
केनवडजवळ भरधाव कंटेनरने तरुणाला चिरडले; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग - वाशिम नागपूर-मुबंई अपघात बातमी
महामार्गाच्या कामामुळे येथे अनेकवेळा अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. कंत्राटदारावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत जागेवरून हटणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.
महामार्गाच्या कामामुळे येथे अनेक वेळा अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. कंत्राटदारावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत जागेवरून हटणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. ग्रामस्थांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. मात्र ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम असून कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, नंतरच आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.