वाशिम - एरवी कायद्याचा बडगा उगारून गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडणारे अनेक पोलीस कर्मचारी व अधिकारी राज्यात पाहिले आहेत. मात्र, वाशिममध्ये सध्या महिला पोलीस कर्मचऱ्याचे एका अनोख्या कार्याची चर्चा सुरू आहे. या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी बेडरुमपासून ते किचनरुम पर्यंत वृक्षाची लागवड करून ऊन्हाला पर्याय शोधला आहे. (Women Police Planted Trees at Home) वाशिम येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या वृश्रप्रेमी महिला पोलीस कर्मचारी मीनाक्षी भाकरे असे यांचे नाव आहे.
घरात नैसर्गिक वातावरण रहावे - उत्तर भारतात आलेली उष्णतेची लाट महाराष्ट्रातदेखील धडकली असून, वाशिम जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर गेला आहे. लाहीलाही करणाऱ्या या उष्णतेची लोटे पासून स्वतःचे परिवाराचे रक्षण व्हावे व घरात नैसर्गिक वातावरण रहावा म्हणून या मीनाक्षी भाकरे महिला पोलीस कर्मचऱ्याने लढवलेली शक्कल कौतुकास्पदच म्हणावे लागेल.