वाशिम - दुचाकीमध्ये साडीचा पदर अडकून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कारंजा तालुक्यातील ग्राम शेलूवाडा येथे घडली. बेबीबाई राजू मस्के (वय, ४२) असे मृत महिलेचे नाव आहे.
मुलाच्या दुचाकीमध्ये साडीचा पदर अडकून आईचा मृत्यू - washim accident
दुचाकीमध्ये साडीचा पदर अडकून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कारंजा तालुक्यातील ग्राम शेलूवाडा येथे घडली.
मृत बेबीबाई राजू मस्के
प्रकृती ठीक नसल्याने बेबीबाई आपल्या मुलासह दुचाकीवर कारंजा येथे उपचारासाठी रुग्णालयामध्ये गेल्या होत्या. रुग्णालयातील काम झाल्यावर परत जाताना तपोवन फाट्याजवळ दुचाकीच्या चाकात त्यांच्या साडीचा पदर अडकल्यामुळे त्यांच्या गळ्याला फास लागल्याने त्या दुचाकीवरून सडकेवर कोसळल्या. त्यानंतर त्यांना कारंजा उपजिल्हा रूगणालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.