वाशिम - जिल्ह्यातील आसेगाव येथे मंगळवारी वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाच्या तडाख्यामुळे आसेगाव येथे पोलीस ठाणे, आरोग्य केंद्र व घरांची कौले, पत्रे उडून गेली वाऱ्यामुळे झाड कोसळले.
वाशिम : आसेगाव परिसराला पावसाचा जोरदार तडाखा
पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्याने आसेगाव परिसरातील नांदगाव, शिवनी, चिंचोली, चिंचखेड, पिंपळगाव या गावात धुमाकूळ घातला.
हैराण करणाऱया उष्म्यानंतर चार वाजता वातावरणात अचानक बदल झाला. सोसाट्याचा वारा सुटल्याने धुळीचे लोट उठले. तसेच अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या तर घरांवरील कौले, पत्रे उडून गेली. ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला.
पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्याने आसेगाव परिसरातील नांदगाव, शिवनी, चिंचोली, चिंचखेड, पिंपळगाव या गावात एवढा धुमाकूळ घातला की, लोकांना आपले जीव मुठीत धरून आपल्या घराचे खांब व छत पकडून सांभाळण्याची वेळ आली.