वाशिम -महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त वाशिमच्या उंबरडा बाजार येथे महाश्रमदानाचा उपक्रम होणार आहे. 'सत्य मेव जयते वॉटर कप' या स्पर्धेतही गावाचा सहभाग आहे. त्यामुळे या महाश्रमदानाच्या उपक्रमात जवळपास दोन हजार नागरिक प्रत्यक्ष सहभागी होवून श्रमदान करणार आहेत. याबाबत ग्रामीण भागात प्रभावी जनजागृती सुरू आहे. तसेच, महाश्रमदान उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी जलमित्र युध्दपातळीवर कामाला लागले आहे.
महाराष्ट्र दिनी उंबरडा बाजार येथे होणार महाश्रमदान; हजारो नागरिकांचा सहभाग
'पाणी हे जीवन आहे, पाणी अडवा, पाणी जिरवा', अशा स्वरूपातील केवळ घोषणाबाजी देण्यापुरते मर्यादित न राहता गावकऱ्यांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी नागरिक हातात कुदळ फावडे घेवून जलसंधारणाच्या विविध कामासाठी पुढे सरसावले आहेत.

महाश्रमदानाच्या या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, शाळा - महाविद्यालयातील विद्यार्थी, प्रशासकीय सेवेतील कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक आणि जिल्हाभरात नियुक्त करण्यात आलेले जलमित्र, असे जवळपास २ हजार नागरिक सहभागी होणार आहे.