महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुष्काळात तेरावा... वाशिममध्ये व्हॉलला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी - भटकंती

मनोरा तालुक्यातील रतनवाडी या गावाजवळ जलवाहिनीचा व्हॉलला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

पाण्याची गळती

By

Published : Jun 12, 2019, 4:18 PM IST

वाशिम - एकीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. तर दुसरीकडे मनोरा तालुक्यातील रतनवाडी या गावाजवळ जलवाहिनीचा व्हॉलला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

रस्त्यावरुन असे पाणी वाया जात आहे
जीवन प्राधिकरण अंतर्गत या जलवाहिनीद्वारे अनेक गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन वाल ची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details