महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूलाच्या बांधकामासाठी खोदकाम.. परिसरातील शेतात पाणी - पूल खोदणीचे पाणी शेतात वाशिम

जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी येथील महामार्गाचे काम चालू आहे. या महामार्गावर पूल बांधण्यात येत आहे. मात्र, पूलाच्या बांधकामासाठी याठिकाणी ठेकेदाराने खोदकाम केले आहे. त्यामुळे याठिकाणीहून जाणारे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जात असून यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

water-enter-into-farm-crop-damage-in-washim
शेतीत पाणी...

By

Published : Jul 18, 2020, 4:42 PM IST

वाशिम- जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी येथील पुलाचे बांधकाम सुरू आहे. ठेकेदाराच्या चुकीच्या कार्यपध्दतीमुळे परिसरातील शेतात पाणी घुसून पिकांचे नुकसान झाले आहे. याबात आमदारांनी कृषी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. यावेळी आमदारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.

शेतात पाणी...

जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी येथील महामार्गाचे काम चालू आहे. या महामार्गावर पूल बांधण्यात येत आहे. मात्र, पूलाच्या बांधकामासाठी याठिकाणी ठेकेदाराने खोदकाम केले आहे. त्यामुळे याठिकाणीहून जाणारे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जात असून यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच कोरोनामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पिकात पाणी गेल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, आमदार लखन मलिक, तहसिलदार किशोर बागडे आणी कृषी विभागातील अधिकार्‍यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details