वाशिम - शेतात विद्युत जोडणी मिळण्यासाठी जिल्ह्यातील वर्धरी खुर्द इथल्या उद्धव आंधळे या शेतकऱ्याने २०१४ मध्ये ५ हजार २०० रुपये कोटेशन भरले आहे. मात्र, अद्याप या शेतकऱ्याला वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. उद्धव आंधळे यांनी वेळोवेळी प्रयत्न करूनही महावितरणने लक्ष देत नसल्याने त्यांनी सहकुटुंब बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
कोटेशन भरून पाच वर्षांनंतरही विद्युत जोडणी नाही; शेतकरी अडचणीत - agitation
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील व दरी येथील उद्धव आंधळे यांच्याकडे १४ एकर शेती आहे. शेती सिंचनाखाली यावी म्हणून २०१४ मध्ये वीज वितरण कंपनीकडे रीतसर अर्ज करून त्यांची ५ हजार २०० रुपये अमानत रक्कम भरली.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील व दरी येथील उद्धव आंधळे यांच्याकडे १४ एकर शेती आहे. शेती सिंचनाखाली यावी म्हणून २०१४ मध्ये वीज वितरण कंपनीकडे रीतसर अर्ज करून त्यांची ५ हजार २०० रुपये अमानत रक्कम भरली. मात्र, अजूनही वीज जोडणी मिळाली नाही त्यांनी बँकेचे कर्ज काढून शेतात पाइपलाइन केली. वीज जोडणी मिळाली नसल्यामुळे त्यांच्यावर कर्ज वाढत आहे. त्यामुळे लवकरात लवकर जर वीज जोडणी मिळाली नाही तर सहकुटुंब उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.