वाशिम - प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे योगदान नेहमीच अग्रस्थानी असते. तसेच माझ्या शालेय शिक्षकांचे माझ्या आयुष्यात फार महत्व आहे. मला घडवण्यात तीन ते चार शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. यामध्ये प्रामुख्याने जामगावकर मॅडमचे नाव घेईल. आताही माझी विचारपूस करण्यासाठी त्यांचा फोन येतो. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला आणखी काम करण्याची स्फूर्ती मिळते, असे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी म्हणाले.
तस्मै श्री गुरवे नमः 'गुरुंना भेटल्यानंतर आजही काम करण्याची स्फूर्ती मिळते' - वाशिम पोलीस अधीक्षक वसंत परदेशी
आज गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त आम्ही तुमच्यासाठी 'तस्मै श्री गुरवे नमः' ही सिरीज घेऊन आलो आहोत. त्याद्वारे वाशिमचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी गुरूबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तस्मै श्री गुरवे नमः 'गुरुंना भेटल्यानंतर आजही काम करण्याची स्फूर्ती मिळते'
कनिष्ठ महाविद्यालयात असताना शेटे सर जीवशास्त्र खूप छान शिकवायचे. त्यामुळे ते मला खूप आवडत होते. मला घडविण्यात त्यांची खूप मोठी भूमिका आहे. फक्त त्यांच्यामुळे मी बारावीत असताना जीवशास्त्रामध्ये टॉप करू शकलो, असेही परदेशी सांगितले. तसेच त्यांनी आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुंना वंदन केले. तसेच सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.