वाशिम -शहरातून 235 जणांना घेऊन जाणाऱ्या चार कंटेनरला पकडण्यात आले असून, या सर्वांना स्थानिक तंत्रनिकेतनमध्ये ठेवण्यात आले आहे. शहरातून रिसोड मार्गाने जात असलेल्या चार कंटेनरला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. या कंटेनरमध्ये बंगळुरू आणि हैदराबाद येथे काम करणारे 231 मजूर होते.
वाशिम पोलिसांनी 235 जणांना घेऊन जाणारे चार कंटेनरला पकडले - वाशिम कोरोना संकट
वाशिम शहरातून 235 जणांना घेऊन जाणाऱ्या चार कंटेनरला पकडण्यात आले असून, या सर्वांना स्थानिक तंत्रनिकेतनमध्ये ठेवण्यात आले आहे. या कंटेनरमध्ये बंगळुरू आणि हैदराबाद येथे काम करणारे 231 मजूर होते.
सर्व मजूर राजस्थानमध्ये आपल्या गावी जात असल्याची पोलिसांनी सांगितले. 231 मजुरांसहित 4 कंटेनर आणि त्याच्या चालकांना ताब्यात घेण्यात आले असून या सर्वांची शासकीय तंत्र निकेतनमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. मजुरांच्या आरोग्य तपासणीनंतर त्यांना पुढील 14 दिवस येथेच ठेवले जाणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने त्यांची जेवण राहण्याची संपूर्ण व्यवस्था केली आहे.
ट्रक चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असून, जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठया संख्येने मजुरांचे कंटेनर आल्याने नाका बंदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.