वाशिम- हैदराबाद येथे घडलेल्या घटनेनंतर देशभरातील मुली आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात अशी घटना घडू नये. यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिला व मुलींसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाशिम शहर पोलीस ठाण्यामध्ये आज शहरातील सर्वच शाळा महाविद्यालयातील मुलींना सुरक्षा विषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
वाशिम पोलिसांकडून शालेय मुलींना मार्गदर्शन - मोहीम
वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिला व मुलींसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाशिम शहर पोलीस ठाण्यामध्ये आज शहरातील सर्वच शाळा महाविद्यालयातील मुलींना सुरक्षाविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबीरात उपस्थित मुली
यावेळी शहरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. अनेक मान्यवरांनी मुलींना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यात कुठेही मुली व महिलांना अडचण आल्यास हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे.
हेही वाचा - वाशिम: घरकुलाची रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर; तक्रारदाराचे टॉवरवर चढून आंदोलन