महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिमेंटने भरलेला ट्रक चोरी; कर्नाटक राज्यातून दोन अट्टल गुन्हेगारांना अटक - कर्नाटक गुन्हेगार अटक

सिमेंटने भरलेला ट्रक चोरीप्रकरणी मागील वर्षी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. तपासात फरार असलेले आरोपी दस्थगिर मच्छीवाले व गफर अहमद या दोन अटल आरोपींना कर्नाटक राज्यातून अटक केली आहे.

sand robbery issue
सीमेंटने भरलेला ट्रक चोरी; कर्नाटक राज्यातून दोन अट्टल गुन्हेगारांना अटक

By

Published : Dec 18, 2019, 11:49 AM IST

Updated : Dec 18, 2019, 3:11 PM IST

वाशिम -वाहन चोरीचे गुन्हे वाढल्याने पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे तपास मोहीम राबविण्यात आली. वाशिम शहरातील पुसद नाक्याजवळून मागील वर्षी सिमेंटने भरलेला ट्रक (अंदाजे किंमत 6 लाख 11 हजार रुपये) मुद्देमाल चोरी प्रकरणी कर्नाटक राज्यातून दोन अट्टल गुन्हेगारांना वाशिम शहर पोलिसांनी अटक केली आहे.

सीमेंटने भरलेला ट्रक चोरी; कर्नाटक राज्यातून दोन अट्टल गुन्हेगारांना अटक

हेही वाचा -विवाहित महिलेची राजस्थानात 2 लाखात विक्री; 6 आरोपींना अटक

गुन्ह्यात मागील वर्षी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. तपासात फरार असलेले आरोपी दस्थगिर मच्छीवाले व गफर अहमद या दोन अटल आरोपींना कर्नाटक राज्यातून अटक केली आहे. पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज यांनी दिली.

हेही वाचा -शुभ कल्याण मल्टीस्टेटचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे, मैत्रेय चिटफंडचाही तपास वेगाने

Last Updated : Dec 18, 2019, 3:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details