वाशिम -जिल्ह्यातील मेडशी येथे श्रावण महिन्यात बंजारा समाजातील सर्व महिला, पुरूष आणि बालक मोठ्या उत्साहाने तिज उत्सव साजरा करतात. दहा दिवस चालणार या तिज उत्सवातून वाशिममधील बंजारा समाज आपल्या परंपरेची जपवणूक करताना दिसत आहे.
मेडशी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील श्रावण महिन्यात बंजारा समाजातील महिला व पुरुषांनी मोठ्या उत्साहात तिज उत्सव साजरा केला. या वेळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत पारंपरिक बंजारा पोषाखात महिला व लहान मुलींनी सहभाग घेतला होता. महिलांनी डोक्यावर तिज घेऊन बंजारा भाषेतील गीत गात, नृत्य करत या तिजची गावातुन मिरवणूक काढण्यात आली.