वाशिम- मालेगाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, ज्वारी, कापूस ही पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे पिकांची नुकसान भरपाई तत्काळ मिळावी म्हणुन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांनी पावसामुळे खराब झालेल्या सोयाबीनची होळी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
पीक नुकसान भरपाईसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन हेही वाचा -नुकसानीचे सर्वेक्षण करायला आलेले अधिकारी अडकले गाळात
तालुक्यातील मारसूळ गावच्या शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला होता. मालेगाव तालुक्यातील मुंगळा महसुल मंडळ सोडून इतर गावांना सर्व्हेमधून वगळण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. भाजप सरकार विधानसभेच्या विजयामध्ये रमले असून त्यांचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.
हेही वाचा -अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा - बबनराव लोणीकर
पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभा घुगे यांनी केली.