महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात तीन मध्यम व १३१ लघुप्रकल्प कोरडे ठाक - दमदार पाऊस

वाशिम जिल्ह्यात अद्यापपर्यंत दमदार पाऊस न झाला नाही. कमी पावसामुळे जिल्ह्यातील तीन मध्यम व १३१ लघुप्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत.

वाशिम जिल्ह्यात तीन मध्यम व १३१ लघुप्रकल्प कोरडे ठाक

By

Published : Jul 30, 2019, 12:10 PM IST

वाशिम- जिल्ह्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सार्वत्रिक पावसाला सुरुवात झाली आहे. मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यावर आभाळमाया कायम असून, रिमझिम पाऊस सुरू आहे. असे असले तरी अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला नाही. कमी पावसामुळे जिल्ह्यातील तीन मध्यम व १३१ लघुप्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत.

वाशिम जिल्ह्यात तीन मध्यम व १३१ लघुप्रकल्प कोरडे ठाक


त्यामुळे पाणी टंचाईचे संकट कायम आहे. अशा परिस्थितीत वाशिमकरांची तहान भागविणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या दीड टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे.सध्या कोकलगाव येथील पैनगंगा नदी पात्रातील पाणी आणण्याचा एकमेव पर्याय आहे. या प्रमाणेच इतर ठिकाणी देखील पर्यायी व्यवस्था शोधून अंमलबजावणी करण्याची गरज आहे. जिल्ह्यात जिल्हाप्रशासन कडून काय उपाययोजना होते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details