महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधिताचा दुसरा रिपोर्ट आला 'निगेटिव्ह' - गर्दीमुळे कोरोना प्रसाराची भीती

मालेगाव तालुक्यातील 65 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा 15 व्या दिवसानंतरचा अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आला आहे. आता 16 व्या दिवसानंतरचा त्याचा अहवाल येणे बाकी असून याकडे आरोग्य विभागासह जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.

वाशिम जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधिताचा दुसरा रिपोर्ट आला 'निगेटिव्ह'
वाशिम जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधिताचा दुसरा रिपोर्ट आला 'निगेटिव्ह'

By

Published : Apr 18, 2020, 10:43 AM IST

Updated : Apr 18, 2020, 4:59 PM IST

वाशिम- मालेगाव तालुक्यातील 65 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा 15 व्या दिवसानंतरचा अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आला आहे. आता 16 व्या दिवसानंतरचा त्याचा अहवाल येणे बाकी असून याकडे आरोग्य विभागासह जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.

वाशिम जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधिताचा दुसरा रिपोर्ट आला 'निगेटिव्ह'
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. महानगर तसेच परराज्यातून आलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी केली असून या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, 1 एप्रिलला मेडशी येथील एका 65 वर्षीय व्यक्तीला संदिग्ध म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्याचे 'थ्रोट स्वॅब' नागपूरला तपासणीसाठी पाठविल्यानंतर 3 एप्रिलला या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

या रुग्णावर सामान्य रुग्णालयातील 'आयसोलेशन' कक्षात उपचार करण्यात आले. त्यानंतर 15 व्या दिवशी त्याचा 'थ्रोट स्वॅब' तपासणीसाठी पाठविण्यात आला. शुक्रवारी त्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असून 16 व्या दिवशीचा अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान, 15 व्या दिवशीचा त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता 16 व्या दिवशीच्या अहवालानंतर जिल्हा कोरोनामुक्त होतो की, नाही ते स्पष्ट होणार आहे.

Last Updated : Apr 18, 2020, 4:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details