महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Akola-Buldhana-Washim MLC elections 2021 : विधान परिषदेसाठी मतदानाला सुरुवात, कुणाच्या गळ्यात विजयाची माळ ? - Legislative Council elections

अकोला-बुलडाणा- वाशिम या स्थानिक मतदारसंघासाठी आज शुक्रवारी (दि. 10 डिसेंबर)रोजी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी 4 पर्यंत हे मतदान होणार आहे. जिल्ह्यात वाशिम, रिसोड, कारंजा आणि मंगरूळपीर अशी चार मतदान केंद्र असून येथे एकूण 168 मतदार मतदान करणार आहेत. वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य संख्या ही महाविकास आघाडीकडे आहे. भाजप निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

विधान परिषदेसाठी मतदानाला सुरुवात
विधान परिषदेसाठी मतदानाला सुरुवात

By

Published : Dec 10, 2021, 11:46 AM IST

Updated : Dec 10, 2021, 1:36 PM IST

वाशिम - विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा- वाशिम या स्थानिक मतदारसंघासाठी आज शुक्रवारी (दि. 10 डिसेंबर)रोजी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी 4 पर्यंत हे मतदान होणार आहे. जिल्ह्यात वाशिम, रिसोड, कारंजा आणि मंगरूळपीर अशी चार मतदान केंद्र असून येथे एकूण 168 मतदार मतदान करणार आहेत. वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य संख्या ही महाविकास आघाडीकडे आहे. भाजप निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. कुणी किती मते आपल्या पारड्यात पाडून घेतली हे 14 डिसेंम्बर रोजी निवडणूक निकाला नंतर स्पष्ट होईल.

जिल्ह्यात या मतदान केंद्रावर होत आहे मतदान

वाशिम तहसील कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे 52 आणि वाशिम नगर परिषदेचे 34 सदस्य तसेच जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांचे 6 सभापती असे एकूण 58 सदस्य करणार मतदान करणार आहेत. कारंजा तहसील कार्यालयात कारंजा नगर परिषदेचे 32 सदस्य मतदान करणार आहेत. तर, मंगरूळपीर तहसील कार्यालय येथे नगर परिषदेचे 21 सदस्य मतदान करणार आहेत.

रिसोड तहसील कार्यालय येथे रिसोड नगर परिषदेचे 23 सदस्य करणार मतदान

वाशिम जिल्हा परिषदेची सदस्य संख्या- 52...
राष्ट्रवादी काँग्रेस -14
काँग्रेस - 11
शिवसेना - 6
भाजपा - 7
जनविकास - 6
वंचित - 6
स्वाभिमानी शे संघटना-1

जिल्ह्यातील सहा पंचायत समिती सभापती

वाशिम पं स. - काँग्रेस
रिसोड पं स. - राष्ट्रवादी
मंगरूळपिर पं स.- राष्ट्रवादी
कारंजा पं स.- राष्ट्रवादी
मानोरा पं स - भाजप
मालेगांव पं स - जनविकास आघाडी

हेही वाचा -legislative council elections 2021 : विधान परिषदेच्या दोन जागेंसाठी मतदान सुरू, कोण मारणार बाजी?

Last Updated : Dec 10, 2021, 1:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details