वाशिम -आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसंग्रामने बारा जागांची मागणी केली आहे. अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज वाशीम येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
शिवसंग्रामकडून विधानसभेसाठी 12 जागांची मागणी - विनायक मेटे युतीकडून आम्हाला बारा जागा नक्की मिळतील - मेटे
मेटे म्हणाले की, जागांबाबत मुख्यमंत्री यांच्या सोबत दोन वेळा चर्चा झाली आहे. लवकरच युतीच्या जागा वाटपा बद्दल निर्णय होणार आहे. आम्ही राज्याताल बारा जागांची मागणी केली असून, त्यामध्ये एक जागा हि वाशिम जिल्ह्याताल रिसोड विधानसभा मतदारसंघ आहे. शिवसंग्राम हा युतीतील एक प्रामाणिक पक्ष आहे. यामुळे आम्हाला बारा जागा नक्की मिळतील असा विश्वास मेटे यांनी यावेळी व्यक्त केला.
विनायक मेटे हे स्वतः बीड मधून लढणार आहेत, असे विनायक मेटे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.