वाशिम - सोनाळा येथील अडान नदीवर सोनल प्रकल्पाची निर्मिती झाली आहे. त्याच सोनाळा प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी नदीवरून काढण्यात आले. तसेच काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला मोठा पूर आला. सोनाळा रस्त्यावर पुलाची उंची कमी असल्यामुळे त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. सोनाळा येथील ग्रामस्थांना ये-जा करता येत नाही. गावाच्या मागील बाजूस हा प्रकल्प आहे.
मान्सून २०२० : पुलावरून पाणी वाहत असल्याने गावचा संपर्क तुटला - monsoon in washim
सोनाळा येथील अडान नदीवर सोनल प्रकल्पाची निर्मिती झाली आहे. त्याच सोनाळा प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी नदीवरून काढण्यात आले. तसेच काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला मोठा पूर आला.
मान्सून २०२०: पुलावरून पाणी वाहत असल्याने गावचा संपर्क तुटला
पुलावरून पाणी कमी होईपर्यंत थांबावे लागले. त्यामुळे रस्ता करून देण्याची मागणी गावकरी करत आहेत. संपूर्ण मराठवाड्यात आणि काही ठिकाणी विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता.