वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या ग्रामस्थांना अवाजवी दरात भाजीपाला विकत घेण्याची वेळ आली आहे. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरात भाजीपाला व्यापाऱ्यांनी मनमानी भाववाढ केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची मोठया प्रमाणावर आर्थिक लूट सुरू आहे.
वाशिम जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले - vegetable Inflation in washim
बटाटे, कांदे, टॉमेटो, भेंडी, गवार, सांभार भाजीपाला 30 टक्के ज्यादा दराने विकत घेण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. वेळेच्या बंधनामुळे भाजीमार्केटमध्ये भाजीपाला घेण्यासाठी सामाजिक अंतर न पाळता नागरिकांची झुंबड दिसून येत आहे.
बटाटे, कांदे, टॉमेटो, भेंडी, गवार, सांभार भाजीपाला 30 टक्के ज्यादा दराने विकत घेण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. वेळेच्या बंधनामुळे भाजीमार्केटमध्ये भाजीपाला घेण्यासाठी सामाजिक अंतर न पाळता नागरिकांची झुंबड दिसून येत आहे. प्रशासनाने महागाईची गंभिर दखल घेतली पाहिजे. तसेच वेळेच्या बंधनामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी-विक्री साठी बदल करावा. जेणेकरून ग्रामस्थांना व शहरातील नागरिकांना या जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या वेळेस लूट होणार नाही. अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.