महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममध्ये अल्पवयीन बालकासोबत अनैसर्गिक कृत्य - Unnatural act with a minor in Washim

एका १३ वर्षीय बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याची संतापजनक घटना वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे घडली.

Unnatural act with a minor in Washim
वाशिममध्ये अल्पवयीन बालकासोबत अनैसर्गिक कृत्य

By

Published : Dec 28, 2019, 7:50 AM IST

वाशिम -जिल्ह्यातील मालेगाव येथे एका १३ वर्षीय अल्पवयीन बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याची संतापजनक घटना घडली आहे. मुलाला मोटार सायकलवर बसवून निर्जनस्थळी नेऊन त्याच्या सोबत अनैसर्गिक कृत्य करण्यात आले.

हेही वाचा... एकतर्फी प्रेम करणाऱ्याच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या

मालेगाव येथील गांधीनगर भागात राहणारा १३ वर्षीय अल्पवयीन बालक आणि त्याच्या पालकांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पालिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, हा लहान मुलगा रस्त्याने जात असताना एका मोटरसायकलवर त्याच्याच ओळखीचे सज्जु चौधरी व दुसरा एक अनोळखी युवक त्याच्या जवळ आले. त्यांनी त्याला रस्त्यावर अडवले आणि मोटारसायकलवर बसवून निर्जनस्थळी नेले. तिथे त्याच्या सोबत अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. मुलगा जेव्हा घरी आला, तेव्हा त्याने ही बाब घरी पालकांना सांगितली. यानंतर घरच्यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली.

हेही वाचा... 'माणदेशी महिलेचा प्रामाणिकपणा; अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण सापडलेल केलं परत'

ABOUT THE AUTHOR

...view details