वाशिम -नागपूर-जालना राज्यमहामार्गावरील पांगरीकुटे जवळील शेतात सकाळी 9 वाजेच्या दरम्यान एका 30 ते 35 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या झाली असून हा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला आहे. मृतदेहाच्या कपाळावर आणि छातीवर गोळ्या लागल्याच्या निषाणी आहे. अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नसून या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी अघटनास्ठळी धाव घेत पंचनामा केला.
अद्याप ओळख पटेलेली नाही -
पांगरीकुटे येथील शेत शिवारात 12 सप्टेंबरच्या सकाळच्या दरम्यान स्त्यालगत असणार्या एका शेतात अंदाजे 30 ते 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला. या व्यक्तीच्या छातीवर आणि कपाळावर गोळ्या मारण्यात आल्या आहे. त्यामुळे चेहराही ओळखणे कठीण झाले आहे. तसेच मृतकाच्या छातीवर एम. आर. लव दिल असलेला टॅटू आहे. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
हेही वाचा -राज्याचे महाधिवक्ता कुंभकोणी यांच्या कार्यप्रणालीवर नाना पाटोलेंचा संशय