वाशिम- शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बागेला अज्ञात आरोपींनी जाळल्याने खळबळ उडाली. ही घटना वाशिम येथे सोमवारी रात्री घडली. अनिल लोनसुने व रवी मारशेटवार असे त्या जाळण्यात आलेल्या आंब्याच्या बागमालकांची नावे आहेत.
समाजकंटकांनी आंब्याची बाग जाळली; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान - Fire
वाशिम येथे सोमवारी रात्री शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बागेला अज्ञात आरोपींनी जाळल्याने खळबळ उडाली.
कोकण पाठोपाठ वाशिम जिल्ह्यातही आंबा बागेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाशिम येथील अनिल लोनसुने व रवी मारशेटवार यांनी मोठ्या कष्टाने पाच एकरावर आंब्याची बाग लावली. यंदा आंब्यांना चांगला बहर ही आला होता. मात्र सोमवारी रात्री बागेला अज्ञात आरोपींनी आग लावल्याने फळासह आंब्याची झाडे पूर्णपणे जळाली आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आता हे नवीन संकट आल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे महसूल विभागाने पंचनामे करुन भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.