वाशिम- कारंजा-दारव्हा रस्त्यावर एसटी बस आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे. यात दोघे ठार झाले आहेत.
कारंजा-दारव्हा मार्गावर भीषण अपघात, दोघे ठार - भीषण
कारंजा-दारव्हा रस्त्यावर एसटी बस आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे. यात दोघे ठार झाले आहेत.
अपघातग्रस्त वाहने
या अपघातात चिरडल्याने दुचाकी चालक प्रकाश ठक हे जागीच ठार झाले. तर पप्पू मॅकेनिक गंभीर जखमी झाले. पप्पू यांच्यावर कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.