वाशिम - जिल्ह्यातील कारंजा मुर्तीजापूर रस्त्यावर चारचाकी व दुचाकी वाहनात भीषण अपघात झाला आहे. यात कारंजा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका परिचारिका व अन्य एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
कारंजा-मुर्तीजापूर रस्त्यावर जुडवा हनुमान जवळ चारचाकी व दुचाकीचा वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कारंजा ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत असलेले परिचारिका पूजा चव्हाण व अक्षय विजय राठोड यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
कारंजा-मुर्तिजापूर रस्त्यावर कार-दुचाकीचा अपघात, दोघांचा मृत्यू - वाशिम जिल्हा बातमी
कारंजा-मुर्तिजापूर रस्त्यावर कार व दुचाकीचा अपघात झाला असून त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.
अपघातग्रस्त वाहन
ऋषिकेश संजय काळे, गणेश श्रीराम सांगोळे हे गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा -कोरोनाला हरविण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक - मुख्यमंत्री ठाकरे