वाशिम - हिंगणघाटमधील दुर्दैवी घटनेतील पीडितेला अखेर आपल्या प्राणाला मुकावे लागले. तिच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी शक्ती मिळावी व ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो, यासाठी वाशिम शहरातील महिलां व विध्यार्थीनी आबेडकर चौकात प्रार्थना करत कँडल लावल्या. या पीडितेला काही वेळ मौन पाळून तसेच मशाल पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली.
वाशिममध्ये हिंगणघाट पीडितेला श्रद्धांजली.. महिलांचा कॅंडल मार्च - वर्धा जळीत प्रकरण
हिंगणघाटमधील दुर्दैवी घटनेतील पीडितेला वाशिममध्ये श्रद्धांजली वहाण्यात आली. या वेळी तिच्या मारेकऱ्याना कठोर शिक्षा व्हायला हवी अशी मागणी करण्यात आली.
कँडल लावून पीडितेला काही वेळ मौन पाळून श्रद्धांजली
ती आपल्यातून निघून गेली असली तरी तिच्या मारेकर्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. पुन्हा कोणत्या युवतीला अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही, अशी अद्दल त्याला घडली पाहिजे, अशी मागणी यावेळी महिलांनी केली आहे.